Posts

Showing posts from April, 2024

सोने खरेदी करताना घ्यावयाची काळजी !!!!!

Image
  सोने खरेदी करण्याआधी जाणून घ्या ह्या गोष्टी ,नंतर कधीच डोकीला ताप होणार नाही.!!!     कोणते सोने चांगले?आणि आम्ही कोणते सोने घेऊ?हा प्रश्न संगळ्यानाच पडतो पण उत्तर काय मिळत याच. सगळ्यात चांगले सोने घ्यायचे असेल तर भेट द्या आमुक आमुक दुकानाला , आणि हे देखील खूप छान आहे , आणि या ब्रॅंड चे तर आमुक तमुक हीरो ने जाहिरात केली म्हणून आपण ते खरेदी करतो.                       या साऱ्या लोकानी आपापल्या ब्रॅंड वर काम केले आहेत. त्यात काहीच शंका नाही,पण मी शोध घेते,सर्वसामान्य लोकांच्या साठी. मला एक सांगा जेव्हा तुम्ही कोणत्यातरी बँकेत जाता तेव्हा तुम्हाला सोन नावाजलेल्या ब्रॅंड चे असेल अगर दुसऱ्या कोणत्याही ब्रॅंड चे असो त्याच्यावर तेवढेच कर्ज मिळते . मग सरकार मान्य आसलेले हॉल मार्क सोने जर मिळत असेल तर ते घेणे योग्य . विचार करा आणि निर्णय घ्या. ब्रॅंड च्या पाठीमागे लागू नका

"शेतकऱ्यांनो एकदा विचार करा " !!!!!

Image
  हा लेख वाचल्याने जगातील कोणताच शेतकरी आत्महत्या करणार नाही.   शेती करणारा फक्त शेतकरी नसतो, तो कोणाचातरी मुलगा असतो,कोणाचातरी बाप असतो,आणि कोणाचातरी नवरा आसतो. खूप दिवसा पासून ऐकत आहे,’’माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा,त्याच्या भाळी लिहिला भाकरी आणि कांदा’’. शेतकरी कर्जाला कंटाळून,आत्महत्या करतो,पन त्याच्या नंतर त्याच्या परिवाराचे हाल,त्याला नाही माहीत.         “जो    कोणी शेतकरी आहे त्याने हा लेख उघड्या डोळ्यांनी पहावे’’        तुझी, ती म्हातारी आई जिचे डोळे आजही त्या वाटेवर आहेत,तिची अंधुक  नजर आजही तुला त्या वाटेवर शोधत आहेत. तिला विसर पडला आहे,आता तिचा मुलगा पुनः ह्या डोळ्याना दिसणार नाही. मुलाला घरी परत येणाऱ्या दिशेने पाहण्याचे सुख आता तिच्या डोळ्याना कधीच मिळणार नाही.तू गेलास पण जाताना तिची अंधुक नजरही नेलेस.     तुझी बायको जीच्यासोबत तू सात जन्माचा करार करून मध्येच सोडून गेलास,जीच्यासोबत ज्या झाडाखाली तू सुख-दुखच्या गोष्टी केल्यास,ज्या झाडाखाली बसून तिला हेही दिवस जातील  आणि चांगले दिवस येतील ह्...