"शेतकऱ्यांनो एकदा विचार करा " !!!!!
हा लेख वाचल्याने जगातील कोणताच शेतकरी आत्महत्या करणार नाही.
शेती करणारा फक्त शेतकरी नसतो, तो कोणाचातरी मुलगा असतो,कोणाचातरी बाप
असतो,आणि कोणाचातरी नवरा आसतो.
खूप दिवसा पासून ऐकत आहे,’’माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा,त्याच्या भाळी
लिहिला भाकरी आणि कांदा’’.
शेतकरी कर्जाला कंटाळून,आत्महत्या करतो,पन त्याच्या नंतर त्याच्या परिवाराचे
हाल,त्याला नाही माहीत.
“जो कोणी शेतकरी आहे त्याने हा लेख उघड्या डोळ्यांनी पहावे’’
तुझी, ती म्हातारी आई जिचे डोळे आजही त्या
वाटेवर आहेत,तिची अंधुक नजर आजही तुला
त्या वाटेवर शोधत आहेत. तिला विसर पडला आहे,आता तिचा मुलगा पुनः ह्या डोळ्याना
दिसणार नाही. मुलाला घरी परत येणाऱ्या दिशेने पाहण्याचे सुख आता तिच्या डोळ्याना
कधीच मिळणार नाही.तू गेलास पण जाताना तिची अंधुक नजरही नेलेस.
तुझी बायको जीच्यासोबत तू सात जन्माचा करार करून मध्येच सोडून गेलास,जीच्यासोबत ज्या झाडाखाली तू सुख-दुखच्या गोष्टी केल्यास,ज्या झाडाखाली बसून तिला हेही दिवस जातील आणि चांगले दिवस येतील ह्या आशेने, तुझ्यासोबत चटणी भाकर खाऊन तिनेही उगड्या डोळ्यांनी हे स्वप्न बघितले,त्याच झाडावर तू स्वताला संपवलस,तुझी बायको आजही तुला साथ देते,तुझी सोबत शोधत त्या झाडाखाली येते,पन जोरजोराने रडताना दिसते रे,तू गेलास पन जाताना तिचा सोबती नेलास. आता तिला जगायच आहे पन तिला कोणी म्हणणार नाही,हे ही दिवस जातील ग?..... तुझा मुलगा जो आज उनाडा सारखा फिरतो आहे,त्याला फक्त तुझ्या आवाजाची गरज आहे.आता त्याला आईचा हात लागतो कुठे?तू तर गेलास,आणि जाताना त्याच भविष्य पन नेलास.
आणि तुझी मुलगी जिला ‘’पहली बेटी तूप रोटी’’
म्हणून जिचा स्वीकार केलास आज कन्यादानासाठी बोहल्यावर गेल्यावर तिच्या डोळ्यातून
पानी थांबेना,सर्वाना वाटत होत की तिला सासरी जायच म्हणून रडते,पन ती कोणाला सांगू शकली नाही
की तिला तिच्या बापाची आठवण येते,त्या बापाची ज्याच्या सुखासाठी ती शाळा सोडून घरी
बसली,त्याच्यासाठी ती पिझ्झा,बर्गर च्या जमान्यात ही त्याच्या समोर चटणी भाकर
खाताना कधीही फुगली नाही. आज तो बाप नाही. तीच मन बोलत होत,त्रास तर सगळ्यांना होत
होता पन आम्ही निभावतो मग तुम्ही का गेलात सोडून?आईच्या जिवावरचा भार कमी करण्यासाठी लग्न तर करते,पन माझ्या माणसांना
सोडून दुसऱ्या शहरात जाऊ शकत नाही मी, आणि तुम्ही आम्हा सर्वाना सोडून कसे गेलात
बाबा.तुमच दुख मोठ होत काय आमच्यावरचे तुमचे प्रेम खोटे होते,हे सांगण्यासाठी तरी
परत या. परत या,..?
त जिवावरचा भर कमी करण्यासाठी लग्न तर करते,पन माझ्या माणसांना सोडून दुसऱ्या शहरात जाऊ शकत नाही मी, आणि तुम्ही आम्हा सर्वाना सोडून कसे गेलात बाबा.तुमच दुख मोठ होत काय आमच्यावरचे तुमचे प्रेम खोटे होते,हे सांगण्यासाठी तरी परत या. परत या,..?
Comments
Post a Comment