Posts

Showing posts with the label shetkari

"शेतकऱ्यांनो एकदा विचार करा " !!!!!

Image
  हा लेख वाचल्याने जगातील कोणताच शेतकरी आत्महत्या करणार नाही.   शेती करणारा फक्त शेतकरी नसतो, तो कोणाचातरी मुलगा असतो,कोणाचातरी बाप असतो,आणि कोणाचातरी नवरा आसतो. खूप दिवसा पासून ऐकत आहे,’’माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा,त्याच्या भाळी लिहिला भाकरी आणि कांदा’’. शेतकरी कर्जाला कंटाळून,आत्महत्या करतो,पन त्याच्या नंतर त्याच्या परिवाराचे हाल,त्याला नाही माहीत.         “जो    कोणी शेतकरी आहे त्याने हा लेख उघड्या डोळ्यांनी पहावे’’        तुझी, ती म्हातारी आई जिचे डोळे आजही त्या वाटेवर आहेत,तिची अंधुक  नजर आजही तुला त्या वाटेवर शोधत आहेत. तिला विसर पडला आहे,आता तिचा मुलगा पुनः ह्या डोळ्याना दिसणार नाही. मुलाला घरी परत येणाऱ्या दिशेने पाहण्याचे सुख आता तिच्या डोळ्याना कधीच मिळणार नाही.तू गेलास पण जाताना तिची अंधुक नजरही नेलेस.     तुझी बायको जीच्यासोबत तू सात जन्माचा करार करून मध्येच सोडून गेलास,जीच्यासोबत ज्या झाडाखाली तू सुख-दुखच्या गोष्टी केल्यास,ज्या झाडाखाली बसून तिला हेही दिवस जातील  आणि चांगले दिवस येतील ह्...